Wednesday, 13 April 2016

शेती व्यवसाय आज काल आणि उद्या

शेती व्यवसाय

कृषीउद्योगाचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलत असून या क्षेत्राला कुशल, नवीन संकल्पना राबविणाऱ्या, नवनवीन सुधारणा स्वीकारणाऱ्या आणि उत्पादनासाठी नवे मार्ग शोधणाऱ्या प्रशिक्षित व्यक्तींची निकड आहे. हे मनुष्यबळ युवावर्गाच्या रूपात उपलब्ध होणे ही काळाजी गरज आहे. त्याविषयी-
रोजगार संधींच्या दृष्टीतून कृषीक्षेत्राकडे पाहण्याचा युवापिढीचा रोख गेल्या काही वर्षांपर्यंत नकारात्मक आहे असे जाणवायचे. त्यामागे अनेक कारणे होती. यातील प्रमुख  म्हणजे कृषी क्षेत्रातील रोजगार संधींबद्दलची अनभिज्ञता आणि शेतीतील कामाला समाजात प्रतिष्ठा मिळणार नाही, तसेच या कामांतील आमदनी तुलनेने कमी आणि बेभरवशाची, असे गरसमज. मात्र, आज कृषिउद्योगात अशा अनेक नोकरीच्या संधी शक्य आहेत, ज्या योगे उत्तम मिळकत तर होईलच, शिवाय तुमच्या कामाला समाजमान्यताही मिळेल. या सर्व गोष्टींची माहिती युवापिढीपर्यंत पोहोचवता आली आणि यात सरकारी यंत्रणांचा पाठिंबा मिळाला, तर कृषी शिक्षण आणि कृषी उद्योगातील संधींकडे युवावर्गाचा ओघ वाढेल.
Image result for शेती व्यवसाय अडचणी
शेतकी क्षेत्रात तरुणांचा सहभाग महत्त्वाचा ठरतो कारण-
कृषीक्षेत्र आता पूर्वीइतके मेहनतीचे काम राहिले नसून अनेक तांत्रिक सुधारणा व उपकरणांचा अंतर्भाव झाल्याने, टेक्नोसॅव्ही तरुण या क्षेत्राकडे वळून योग्य माहिती व तंत्रज्ञानाचा उपयोग करून स्वत:ची प्रगती करू शकतात, आणि स्वत:ला आणि शेती कामाला प्रतिष्ठा मिळवून देऊ शकतात. तसेच देशातील वाढत्या लोकसंख्येची अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी जास्तीत तरुण होतकरू पिढी या शेत्रात उतरून शेतीचे उत्पादन वाढवण्याची आता आवश्यकता आहे.

सध्या शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिढीची जागा जर तरुण शेतकऱ्यांनी घेतली नाही, तर त्याच जुन्या पद्धतीने केलेल्या शेतीतून मिळणाऱ्या तुटपुंज्या अन्नधान्य निर्मितीचा मेळ वाढत्या अन्नधान्याच्या गरजेशी लागणे कठीण आहे.
देशातील शेती व्यवसायाकडे नवीन पिढीचे असेच दुर्लक्ष होत राहिले तर नजीकच्या भविष्यात शेती उत्पादने आयात करावी लागतील.
समाजमनातील शेतकऱ्याची असलेली गरीब, खेडवळ ही प्रतिमा बदलण्याची गरज आहे. नित्यनवीन तंत्रज्ञान आणि नव्या संकल्पना लीलया ग्रहण करणारी तरुण पिढी हा बदल सहज घडवून आणू शकेल.
तरुण पिढीची ऊर्जा आणि काम करण्याची धडाडी पाहता शेती उद्योगाच्या उत्पादन क्षमतेत भरपूर वाढ होऊ शकेल.
Image result for शेती व्यवसाय अडचणी
तरुण वर्गाला शेतीव्यवसायातील प्रगतीच्या संधींकडे आकर्षति करण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. शाळांमधून वेळोवेळी मुला-मुलींना या व्यवसायाबद्दल सकारात्मक माहिती देण्याची गरज आहे. नोकरी शोधणाऱ्या युवावर्गाला शेती व्यवसायाकडे आकृष्ट करणे महत्त्वाचे ठरते.
सध्याच्या शिक्षण पद्धतीत ‘शेती’ हा विषय अभ्यासक्रमांतून वगळण्यात आलेला दिसतो. आताचे शिक्षण फक्त भविष्यातील पांढरपेशा, कॉर्पोरेट कर्मचारी तयार करीत आहे. मात्र, ज्या अन्नावर आपण आपला देह पोसतो, ते पिकवणाऱ्या कृषी क्षेत्राबद्दलही विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता, आवड निर्माण होणे गरजेचे ठरते.
शैक्षणिक अभ्यासक्रमांतून शेती शिक्षण योग्य प्रकारे युवापिढीसमोर सादर करायला हवा.
सध्या शेती उद्योगात टिकून असलेल्या तरुणांची यशोगाथा उर्वरित तरुण पिढीसमोर आणायला हवी, जेणे करून कृषी क्षेत्राबद्दल त्यांना आकर्षण निर्माण होईल. याकामी मोबाइल फोन, संगणक, इंटरनेट यांचा प्रभावी उपयोग होईल.
 Image result for शेती व्यवसाय अडचणी
जगभरातील १५ वष्रे ते २४ वष्रे वयोगटातील एक अब्ज लोकसंख्येपकी खूप मोठय़ा प्रमाणावर युवावर्ग अशिक्षित, कुपोषित, उपाशी आणि गरिबीने गांजलेला आहे, त्यांच्याकडे नोकरी मिळवण्यायोग्य कौशल्य नसल्याने, यातील ग्रामीण युवावर्ग अर्थार्जनाच्या संधींसाठी स्थलांतर करतो. जर तरुणांना योग्य पाठिंबा आणि संधी दिली तर त्यांच्यातील अतुल्य क्षमता, ग्रामीण सुधारणांच्या कामात भरीव कार्य करू शकेल. यामुळे त्यांची प्रगती होईलच त्याचबरोबर देशाचीही आíथक प्रगती शक्य होईल. आव्हानात्मक नोकरीच्या संधींसाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरून केलेली शेती हा एक मार्ग आहे.
कृषीउद्योगाचा चेहरा आता पूर्ण बदलला आहे. या क्षेत्राला कुशल, नवीन संकल्पना राबविणाऱ्या, नवनवीन सुधारणा स्वीकारणाऱ्या आणि उत्पादनासाठी नवे मार्ग शोधणाऱ्या प्रशिक्षित व्यक्तींची गरज आहे. हे तरुण पदवीधर कुशल, माहितीतज्ज्ञ, बदलत्या काळानुसार विचार करणारे, स्वत:बद्दल आत्मविश्वास असणारे असायला हवेत.
कृषी महाविद्यालयांनी या क्षेत्रासमोर असलेली आव्हाने पेलण्यायोग्य सक्षम आणि जगाची अन्नधान्याची गरज भागवू शकतील असे पदवीधर घडवणे हे स्वत:चे ध्येय मानायला हवे.
कृषीक्षेत्रात अनेक प्रकारच्या कुशल व्यावसायिकांची चणचण भासत आहे. उदा. अ‍ॅग्रोनॉमिस्ट, लाइव्ह स्टॉक प्रोडक्शन स्पेशालिस्ट, फार्म मॅनेजर, अ‍ॅग्रीकल्चरल र्मकडाइज रीप्रेझेन्टेटिव्हज, संशोधक, पत्रकार, विपणन व्यावसायिक, ग्रामीण वित्त पुरवठा अधिकारी, पार्क्‍स रिक्रिएशन ऑफिसर.
शेती क्षेत्रातील पदवीच्या बळावर विद्यार्थी अन्य क्षेत्रातही नोकरी मिळवू शकतात.
भारतातील अनेक कृषी महाविद्यालयांपकी बारामतीचे द कॉलेज ऑफ अ‍ॅग्रीकल्चर हे महात्मा फुले विद्यापीठाशी जोडलेले आहे. आज देशातील हे एकमेव विद्यालय आहे, जे डच युनिव्हर्सटिी ऑफ व्हीएचएल, नेदरलँडशी जोडलेले आहे. अभ्यासक्रमाची पहिली दोन वष्रे बारामतीत शिक्षण घेतल्यानंतर उर्वरित दोन वष्रे विद्यार्थी नेदरलंडला शिक्षण घेऊ शकतात किंवा बारामती विद्यालयात तीन वर्षांचा शिक्षणक्रम पूर्ण करून एक वर्षांसाठी कोणताही अन्य शिक्षणक्रम विद्यार्थी नेदरलंडमध्ये पूर्ण करू शकतात. विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील शिक्षकांकडून, तसेच भारतातील उच्चशिक्षित शिक्षकांकडून ज्ञान मिळते. कृषीक्षेत्राला उत्तम दर्जाचे मनुष्यबळ मिळावे यासाठी अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती यांच्याकडून हा उपक्रम राबविला जातो.
तेव्हा मित्र-मत्रिणींनो, आपल्या जगण्याचा मूलाधार असलेल्या शेती व्यवसायाकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास, आपल्याला प्रगतीच्या अनेक वाटा सापडतील, तेव्हा करिअरचे क्षेत्र निवडताना कृषी क्षेत्राचा प्राधान्याने विचार व्हायला हवा.      
 Image result for शेती व्यवसाय अडचणी
शेतीचे प्रकार : शेतकर्‍याने जीवन साधन मिळविण्यासाठी किंवा धंदा म्हणून स्वतःच्या शेतावर चालविलेला व्यवसाय अशी ढोबळमानाने शेतीची व्याख्या करता येईल. शेतामधून काढावयाच्या उत्पादनावरुन शेतीचे ऊसमळा, भात शेती, पशुधनप्रधान शेती, मत्स्य शेती इ. निरनिराळे प्रकार अस्तित्वात आलेले आहेत. तसेच सिंचनाच्या उपलब्धतेनुसार बागायती शेती, जिराईत शेती असेही प्रकार पडतात. खतांच्या वापरानुसार सेंद्रिय शेती, रासायनिक शेती असे प्रकारसुद्घा अस्तित्वात आले आहेत. स्थूलमानाने नैसर्गिक आणि आर्थिक घटकांमुळे शेतीच्या प्रकारात बदल होतात.

नैसर्गिक किंवा प्राकृतिक घटक हे वर्षावर्षाला बदलत नाहीत. त्यांच्यातील सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हवामान, जमीन आणि भूरचना हे होत. एखाद्या विवक्षित विभागात कोणते पीक येऊ शकेल हे या घटकावर अवलंबून असते. कमी पावसाच्या प्रदेशात जर सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले तर बागायीत कपाशी आणि उसासारखी दीर्घमुदतीची पिके उत्तमरीतीने येऊ शकतात. त्या ठिकाणी अशा तृहेने पूर्वी अस्तित्वात नसलेला असा शेतीचा व्यवहार्य प्रकार निर्माण होऊ शकतो. भात शेती आणि उष्ण-कटिबंधातील फळबागांची शेती कोकणात शक्य आहे. कारण तेथील हवामान भात, आंबे, नारळ, काजू, सुपारी, मसाल्याची पिके याच्या उत्पादनाला पोषक असते. नवीन संकरित जातींमुळेही हवामान, जमीन व भूरचना ह्यांना योग्य अशी पिके आता घेता येतात.
पिके आणि शेतीचा प्रकार हे जमीन आणि भूरचना यांवर अवलंबून असतात; पण या घटकांना जर पर्जन्यमानाचीही जोड मिळाली तर त्यांचे परिणाम अधिक उठावदार दिसतात. खोल, सुपीक आणि सपाट जमीन असेल आणि पाऊस भरपूर व चांगला विभागून पडणारा असेल तर तेथे शेतीची भरभराट झालेली आढळते. डोंगराळ आणि पुरेशा पर्जन्यमानाच्या प्रदेशात गवताळ राने मुबलक असल्याने अशा ठिकाणी सर्वसाधारणपणे कुरणशेती, वनशेती, गवतशेती किंवा पशुधन प्रधान शेती फायदेशीर ठरते. माफक खोलीची जमीन व तुटपुंजा पाऊस असणार्‍या प्रदेशांत ⇨ दुर्जल शेती किंवा जिराईत शेतीशिवाय पर्याय नसतो.
आर्थिक घटक : निरनिराळ्या नैसर्गिक घटकांवरुन कोणत्या भूप्रदेशात काय पिकविता येणे शक्य आहे ते सांगता येईल; परंतु कोणती पिके अगर शेतीचा प्रकार किफायतशीर होईल ते सांगता येणार नाही. ते वेळोवेळी बदलणार्‍या आर्थिक घटकांवरुन ठरवावे लागेल. हे घटक म्हणजे उत्पादन खर्च, विकी खर्च, दुसर्‍या उद्योगधंद्याशी स्पर्धा, शेती उत्पादनाच्या सापेक्ष किंमतीत होणारे बदल, अवास्तव उत्पादन वाढ व घट यांचे दुष्ट चक, त्या त्या बाजारपेठांच्या विशिष्ट मागण्या, जमिनीच्या किंमती, उपलब्ध भांडवल, मजूर पुरवठा, पिकावरील कीड व रोग आणि वैयक्तिक घटक वगैरे. त्यांचा सर्वांगीण होणारा परिणाम लक्षात घेऊन शेतीचे प्रकार नियोजित केले जातात. त्यातील काही महत्त्वाचे प्रकार आणि त्यांची वैशिष्ट्ये पुढे दिलेली आहेत.
एकेरी अगर बहुविध पिकांची शेती : एकेरी पिकाची शेती भारतात फार रुढ नाही. याला कारणेही वेगवेगळी आहेत. त्यात महत्त्वाचे म्हणजे भारतातील शेती ही प्राधान्याने उदरनिर्वाहाच्या हेतूने करण्यात येणारी असून जमीनधारणेचे परिमाण अल्प आहे. शेतकर्‍याला आपल्या लहानशा शेतीच्या तुकड्यात कुटुंबाच्या गरजा भागविण्यासाठी आवश्यक अशी जवळजवळ सर्व प्रकारची शक्य ती उत्पादने काढावी लागतात. सुदैवाने भारतातील हवामान, काही थोडे प्रदेश वगळता, बहुतेक ठिकाणी वर्षभर शेती करण्याला पूरक असे आहे. कोकण विभागातील भात शेती हा एकच आणि जवळजवळ एकेरी पीक पद्घतीसारखा आहे. अमेरिकेसारख्या देशात जमीनधारणेचे परिमाण खूप मोठे असून विशेषीकरणही उच्च् दर्जाचे असते. तेथे गहू, कपाशी, मका, गवत इत्यादींची एकेरी पीक पद्घत रुढ आहे. अर्थात तेथील हवामान बाराही महिने शेतीला पूरक नाही हेही लक्षात घ्यायला पाहिजे. जेथे शेतीचे लहानलहान तुकडे एकत्र करुन ⇨ सामुदायिक शेती अस्तित्वात आहे किंवा महाराष्ट्र राज्य कृषि महामंडळाप्रमाणे राज्य सरकारच्या व्यवस्थेखाली शेती केली जाते, अशा ठिकाणी एकेरी पीक पद्घती अवलंबिली जाते.
 Image result for शेती व्यवसाय अडचणी
बहुविध पिकांची शेती अनेक दृष्टींनी फायदेशीर असते. तिच्यामध्ये उपलब्ध साधनसामगीचा अधिक कार्यक्षमतेने आणि काटकसरीने उपयोग होऊ शकतो. जमिनीची उत्पादनक्षमता टिकविण्याच्या किंवा वाढविण्याच्या बाबतीतही तिची मदत होते. बहुविध पिकांच्या शेतीत काही पिकांत आलेले नुकसान दुसर्‍या पिकांत भरुन निघत असल्याने काही प्रमाणांत नुकसानभरपाई होते. मात्र एकेरी पिकांच्या शेतीत विशेषीकरणाचा जो फायदा मिळतो तो बहुविध पिकांच्या शेतीत मिळत नाही.

दुर्जल शेती : वार्षिक ५० सेंमी. किंवा त्यापेक्षा कमी अशा निश्चित पर्जन्यमानाच्या प्रदेशात दुर्जल शेती करतात. ओल टिकविणे आणि भूसंरक्षण अशा प्रकारच्या शेतीतील महत्त्वाच्या समस्या होत. काही थोड्या पावसाळी महिन्यांत व त्यांच्या थोड्या मागील-पुढील काळात होणारी ही हंगामी शेती असते. पिकांची निवड मर्यादित असते. भूसंरक्षण करण्यासाठी आणि ओलावा टिकविण्यासाठी शेतीच्या मशागतीच्या काही खास शिफारस केलेल्या पद्घती वापरुन ही पिके काढली जातात. उदा., समपातळीत बांध घालून त्यांना समांतर पिकांची पेरणी करणे, कमी बी पेरणे, रोपांची संख्या मर्यादित करणे, पट्टापेर पद्घतीने पीक पेरणे, आच्छादनाचा वापर करणे, खतांचा माफक वापर करणे इत्यादी.

जिराईत शेती : या प्रकारात ५० ते १०० सेंमी.च्या आसपास असणार्‍या, अधिक निश्चित असलेल्या पर्जन्यमानावर पिके काढली जातात. भारतातील काही भागांत खरीप आणि रब्बी अशा दोन हंगामांत पिके काढणे शक्य असते. या प्रकारच्या शेतीत खताचा मुबलक वापर करता येतो. आच्छादनाचा वापर करुन जिराईत शेती जास्त फायदेशीर करता येते. भारतात अनेक राज्यांत अशा प्रकारची शेती करतात.

बागायती शेती : वास्तविक हा शेतीचा प्रकार नसून ती पिके काढण्याची एक पद्घत आहे. या शेतीतील पिके पावसावर अवलंबून नसतात आणि म्हणूनच या पिकांचे उत्पादन जिराईत पिकांपेक्षा अधिक स्थिर असते. पाणीपुरवठ्यामुळे सबंध वर्षभर पिके घेतली जातात. साधनसामगीचा वापरसुद्घा मुबलकपणे आणि किफायतशीरपणे केला जातो. या शेतीच्या समस्या जिराईत शेतीच्या समस्यांपेक्षा वेगळ्या आहेत. उदा., बागायती शेतीपुढील सर्वांत महत्त्वाच्या समस्यांपैकी एक म्हणजे जलोत्सारणाने काळजीपूर्वक रीत्या अतिरिक्त मृदा-जल काढून टाकून जमिनीची उत्पादनक्षमता टिकविणे. याउलट दुर्जल शेतीत पाण्याचा थेंब न् थेंब वाचवून त्याचा उत्पादनवाढीसाठी उपयोग करणे ही समस्या असते.

हंगामी बागायती शेती : पाणीपुरवठा हा बागायती शेतीचा पाया असल्याने त्याचा स्रोतच जर हंगामी असेल तर हंगामी बागायती शेती पद्घतीचा अवलंब करावा लागतो. यात सामान्यतः खरीप आणि रब्बी या हंगामांत संरक्षित पाण्याच्या पाळ्या देऊन पिके घेतली जातात. खरीप हंगामातील पिके बहुतांश पावसाच्या पाण्यावर येतात आणि रब्बी हंगामाच्या उत्तरार्धात उपलब्ध पाण्याचा संरक्षित म्हणून वापर करुन पीक घेतले जाते.
बारमाही बागायती शेती : या प्रकारात पाणीपुरवठ्याचा स्रोत कायम टिकणारा असल्याने खरीप आणि रब्बी हंगामांबरोबर उन्हाळी हंगामातही पिके घेतली जातात. बर्‍याच ठिकाणी ऊस किंवा केळी यासारखे बारमाही बागायत पीक घेणे शेतकरी पसंत करतात.
बागायती शेतीसाठी पाणीपुरवठा करणारा स्रोत विचारात घेऊन विहीर बागायत, धरणाखालील बागायत किंवा उपसा सिंचन बागायत असेही प्रकार करतात.
पिकाला पाणी देण्याच्या पद्घतीवरुन बागायत शेतीचे पाटपाणी बागायत, ठिबक सिंचन, फवारा सिंचन, तुषार सिंचन, मटका सिंचन असेही प्रकार करतात.

फळबाग शेती : या प्रकारच्या शेतीत विविध प्रकारची फळे ही प्रमुख उत्पादनाची बाब असते. कोकणातील हवामान आणि पर्जन्यमान आंबा, नारळ, काजू, सुपारी इ. फळ पिकांना पोषक असते; तर महाराष्ट्राच्या पठारी भागात लिंबू, संत्री, मोसंबी यांसारखी फळ पिके घेतली जातात. कोरड्या हवामानात पाण्याची उपलब्धता असेल तर द्राक्षासारखे पीक खूपच फायदेशीर ठरते. जमीन चांगली सुपीक असेल आणि सिंचन सुविधा उपलब्ध असेल, तर केळीचे पीक उत्तम प्रकारेघेता येते. फळबाग शेतीमध्ये झाडांच्या सुरुवातीच्या काळात पाणी व्यवस्थापन हा महत्त्वाचा भाग आहे. बहुवर्षायू फळझाडे मोठी झाल्यानंतर त्यांना पाण्याची फारशी गरज भासत नाही. उदा., आंबा, चिकू, नारळ, सुपारी इत्यादी. परंतु संत्रा, मोसंबी, लिंबू, द्राक्षे यांना फळे धरण्याच्या हंगामात पाण्याची गरज असते.फळझाडांच्या पाण्याच्या गरजेनुसार फळबागांचे दोन प्रमुख प्रकार पडतात.
कोरडवाहू फळबाग शेती : ज्या प्रदेशात पावसाचे प्रमाण कमी आहे किंवा उपलब्ध सिंचन सुविधा अत्यल्प आणि हंगामी स्वरुपाची आहे, अशा ठिकाणी बोर, डाळिंब, आवळा, सीताफळ इ. फळझाडांची लागवड करुन कोरडवाहू फळबाग शेती केली जाते. पाण्याची अत्यल्प उपलब्धता असूनही कोरडवाहू फळबागा चांगले उत्पन्न मिळवून देतात.

शेती क्षेत्रासाठी महत्त्वाचा हवामान आणि पिकाचा विमा

देशाच्या एकूण आर्थिक उत्पन्नात शेती क्षेत्राचा वाटा १४ टक्के आहे आणि पाऊस कमी झाल्यास शेती उत्पन्नावर व पर्यायाने एकंदर अर्थव्यवस्थेवर लक्षणीय परिणाम होतो.
India Agricultureदेशाच्या एकूण आर्थिक उत्पन्नात शेती क्षेत्राचा वाटा १४ टक्के आहे आणि पाऊस कमी झाल्यास शेती उत्पन्नावर व पर्यायाने एकंदर अर्थव्यवस्थेवर लक्षणीय परिणाम होतो. भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी एकूण तीन पंचमांश ग्रामीण लोकांना या क्षेत्राद्वारे उदरनिर्वाह पुरवला जातो.
भौगोलिकदृष्टया भारतातील सर्वात विस्तृत क्षेत्र म्हणजेच शेती ही हवामान स्थितीवर प्रामुख्याने अवलंबून असते. लागवडीखालील बहुतांश भाग पावसावर अवलंबून असल्यामुळे शेती उत्पन्नाला सतत धोका असतो आणि शेतीवर झालेला कोणताही परिणाम थेट देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतो.
शेती उत्पन्नाच्या वैविध्यावर कीड पडणे, पाऊस, तापमान, आद्र्रता यांसारख्या हवामानाच्या घटकांतील बदलांचा अनपेक्षित परिणाम होत असतो. पावसाची कमतरता किंवा अतिवृष्टीमुळे शेती क्षेत्राला दुष्काळ किंवा पुरासारखे धोकेही संभवतात. अशा प्रकारच्या तीव्र परिस्थितीतच नव्हे तर दैनंदिन वातावरणातही शेतीला बरेच धोके असतात.
हवामानातील बदलांचा सगळ्याच शेती समाजाला तोटा सहन करावा लागतो. जलसिंचनाच्या सोयींचा अभाव, आधुनिक शेती तंत्रे उपलब्ध नसणे यामुळे ही समस्या आणखी तीव्र होते. यामुळे शेती समाजाच्या ग्रामीण कर्जावरही परिणाम होतो. दुष्काळी वर्षात पिकांच्या कर्जावरील व्याज फेडण्यास शेतकरी असमर्थ-काही प्रमाणात निरुत्साही असतात आणि पैसे भरण्याचा कालावधी बदलून घेतात.

Image result for AGRI PROBLEM PHOTO
हवामानामुळे व्यवसायातील आकडेवारीवर परिणाम होतो आणि शेवटी व्यवसायातील नफ्याचे गणित कोलमडते. अशा परिस्थितीपासून शेती समाजाचे रक्षण करणे गरजेचे आहे. शेती क्षेत्राशी संबंधित धोक्यांपासून शेती समाजाचे रक्षण करण्यासाठी जनरल विमा कंपन्यांकडे विविध उत्पादने असतात. ग्रामीण भारत एकंदर अर्थव्यवस्थेचा प्रमुख घटक असल्यामुळे ग्रामीण विमा भारताच्या जीवनेतर विमा कंपन्यांसाठी महत्त्वाचा व्यवसाय आहे.
लोकसंख्येचा मोठा भाग देशांतर्गत शेती उत्पादनावर अवलंबून असल्यामुळे शेती उत्पादकांना त्यांच्या व्यवसायातील धोक्यांपासून वाचवणे गरजेचे आहे. ग्रामीण लोकसंख्येसाठी विविध विमा उत्पादने उपलब्ध असून शेती विमा शेती समाजाला गरजेचे असलेले सुरक्षा कवच पुरवते. शेती उत्पादकांनुसार ग्रामीण विम्याचे दोन विभांगात वर्गीकरण केले जाते- हवामान विमा आणि पिकाचा विमा.
हवामान विमा- हवामान विमा योजना हवामानातील बदलांविरोधात सुरक्षा कवच देतो. तापमान, वा-याचा वेग, पाऊस, आद्र्रता अशा हवामानांतील घटकांमध्ये होणा-या बदलांमुळे होणारा तोटा या विम्यांतर्गत कव्हर होतो.
Image result for शेती व्यवसाय PROBLEM PHOTO
हवामान विम्यामध्ये शेतीमधले विविध घटक कव्हर होतात. उदा. शेतकरी, बँक आणि वित्तीय संस्था/ शेतीसाठी कर्जपुरवठा करणा-या कंपन्या/ बिगर शेती हंगामी कामकाज- ज्यांचे पैसे हवामानातील स्थितीमुळे देणे शक्य होत नाही. या योजनेमध्ये कव्हर होणा-या गोष्टी.
वापरण्यात आलेल्या साहित्याची किंमत- यामध्ये विशिष्ट भौगोलिक प्रदेशात विशिष्ट कालावधीदरम्यान आवश्यक हवामानात झालेल्या बदलांमुळे कमी झालेले शेती उत्पादन कव्हर होते.
स्ट्राइक इंडेक्समधून निरीक्षित हवामान इंडेक्सनुसार हवामानात झालेल्या बदलांमुळे शेती किंवा बिगर आर्थिक उपक्रमांची वाढणारी किंमत रब्बी पिके (हिवाळ्यात लागवड केली जाणारी व वसंत ऋतूत काढली जाणारी पिके) काढणीच्या मार्गावर असून शेतक-यांना थंडी, वारे, अतिवृष्टी यांपासून पिकांचे संरक्षण करून पुढील तोटा टाळणे शेतक-यांसाठी गरजेचे आहे.
हवामानावर आधारित पीक विमा योजनेतर्फे (डब्ल्यूबीसीआयएस) पिकांच्या चक्रादरम्यान हवामानातील बदलांमुळे शेतक-यांचे झालेले नुकसान भरून दिले जाते. तोटा झाल्यास योजनेत उल्लेख केलेली हवामानाची स्थिती, जमा केलेली माहिती यानुसार भरपाईची रक्कम ठरवली जाते आणि स्वतंत्र कंपनीतर्फे हाताळली जाते.
पीक विमा- शेती उत्पादनातील थोडयाशा फरकानेही संपूर्ण अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. कीड पडणे, पाऊस, तापमान, आद्र्रता असे हवामानातील बदल यांचा शेती उत्पादनावर थेट परिणाम होतो. यामुळे शेती उत्पादने व त्यातून होऊ शकणारा तोटा सुरक्षित करणे गरजेचे आहे.
या योजनांमध्ये: नसíगक आग आणि वीज पडणे, वादळ, गारपीट, चक्रीवादळ, वादळी उत्पात, झंझावात, पूर, जमीन खचणे, दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष, कीड/आजार पडणे. कमी पाऊस किंवा तीव्र हवामानामुळे पेरणी/लागवड करणे शक्य न झाल्यास कापणीनंतर झालेला तोटा.

कर्जामुळे येणाऱ्या अडचणी

 कर्ज घेण्याची अनेक कारणे असू शकतात - मुलांच्या लग्नासाठी, शिक्षणासाठी, घर बांधण्यासाठी वा विकत घेण्यासाठी, आजारपणात औषधोपचारांसाठी आणि नाहीच काही तर बेंक सहज कर्ज देत आहे म्हणूनही! कारण काहीही असले तरी कर्जाचे परिणाम वाईटच. कर्जामुळे मानसिक तन येतो आणि त्याचा परिणाम आपल्या मानसिक, शारीरिक आरोग्यावर तसेच आपल्या नातेसंबंधांवरही होतो. अशा या कर्जामुळे आपल्या जीवनात काय काय अडचणी येऊ शकतात याचा विचार करू.
Image result for शेती व्यवसाय अडचणी
  • मानसिक ताण:  डोक्यावर कर्ज असले कि व्यक्ती सतत एक प्रकारच्या मानसिक ताणाखाली वावरत असते. ती चिडचिड करते, भांडते, वारंवार निराश होते. तिच्या मनात नकारात्मक विचार सारखे पिंगा घालू लागतात. कधी-कधी तर नैराश्याने ग्रस्त मनसे इतकी हतबल होतात कि आत्महत्येचा विचार करू लागतात. कित्येक जन या विचारांच्या आहारी जातात. विदर्भातील कित्येक शेतकऱ्यांनी या कर्जापायीच आत्महत्या केल्या.
  • शारीरिक प्रक्रिया: कर्जामुळे सतत ताणाखाली राहिल्यास आपल्या शरीरात काही रासायनिक प्रक्रिया घडून येतात. जेव्हा व्यक्ती सतत ताणाखाली असते तेव्हा त्याच्या शरीरातील ग्रंथींमधून एन्ड्रीनलीन आणि कार्टीझोल हे हार्मोन्स स्त्रवतात. जेव्हा व्यक्तीला  एखाद्या अचानक आलेल्या संकटाशी सामना करायचा असतो तेव्हा  हे हार्मोन्स त्याला मदत करतात परंतु आपले आर्थिक प्रश्न हे काही ताबडतोब सुटणारे नसतात म्हणून आपले शरीर हे 'इमर्जन्सी' मोड मध्येच राहते. जेवढा जास्त वेळ शरीर या स्तिथीत राहील तेवढा जास्त त्या व्यक्तीला ब्लड प्रेशर, पचन संस्था, लहरीपणा, रोगप्रतिकार शक्ती, स्मरणशक्ती इत्यादींशी संबंधित आजार होण्याचा धोका जास्त असतो. जर तुमचे आर्थिक प्रश्न आणखी बिकट झाले तर तुमचा ताण इतका वाढतो कि तुम्ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या कुठलेच काम करू शकत नाही.
  • शारीरिक दुष्परिणाम: जर तुमचे शरीर या स्ट्रेस हार्मोन्सचे उत्पादन करतच राहिले तर तुम्हाला गंभीर शारीरिक आजारांना सामोरे जावे लागू शकते. जर तुम्हाला आधीपासूनच काही शारीरिक व्याधी असतील तर हा ताण त्यांना गंभीर स्वरूप देऊ शकतो. यात तुम्हाला हृदयरोग वा डायबीटीस होण्याचा धोका संभवतो.
    Image result for शेती व्यवसाय PROBLEM PHOTO
  • वर्तणुकीतील दोष: सततच्या ताणामुळे नातेसंबंधांवरही विपरीत परिणाम होतो. तुमची नेहमीची चिडचिड, रागावणे, भांडणे, नैराश्य इतर लोकही फार काळ सहन करू शकत नाही. यामुळे तुम्ही तुमच्या आप्तांना गमवू शकता. तणावग्रस्त अवस्थेत तुम्ही एखादे वाहन चालवत असाल वा एखादे मशीन ऑपरेट करत असाल तर अपघात होण्याचा  धोका संभवतो.
  • सामाजिक अप्रतिष्ठा: कर्जबाजारी माणसाची समाजात काहीच प्रतिष्ठा राहत नाही. त्याला समाजात अकार्यक्षम समजले जाते. डोक्यावर कर्ज असलेल्या माणसाला लोक दरिद्री आणि समाजावर भार मानतात.
    Image result for AGRI PROBLEM PHOTO
उपाययोजना:  
कर्जामुळे येणाऱ्या ताणाला नष्ट करण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे तो ओळखणे आणि त्याचा सामना करणे. तो कसा तर सर्वप्रथम आपल्यावर असलेल्या सर्व कर्जाची आकडेवारी काढणे. आपल्यावर नेमके किती कर्ज आहे? कोणत्या कर्जाचे किती व्याज आहे? ड्यू डेट्स काय आहेत? ही सर्व माहिती लिहून काढणे. आता हे कर्ज कसे फेडता येईल याची एक योजना बनवणे. कडक आर्थिक शिस्त पाळून आणि चांगले आर्थिक नियोजन करून आपण फार न ताणताही आपली कर्जे फेडू शकतो.

2 comments:

  1. Is a casino legal in Texas? - Wooricasinos
    If you're going to gamble 뱃365 online in Texas, what kind 바카라사이드배팅 of regulations would 강원랜드 떡 be in place on the state's casinos? A state law that 해외 사이트 would apply to 텐벳 casino gambling in

    ReplyDelete